Thursday, February 3, 2011

ज्ञान गंगोत्री मतीमंद मुलांच्या निवासी शाळेला भेट

नमस्कार,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात जिथे आपल्या जिवलगांना भेटायलाही वेळ मिळत नाही... आपण फ़क़्त भेटायचे ठरवत असतो पण भेट मात्र कधीही होत नाही...असे एकंदरीत चित्र आपल्या सभोवताल असतांना विजयनगर मधील नारायण सेवा समितीच्या सभासदांनी गेल्या काही महिन्यात ममता बाल सदन, कुंभार वळण, सासवड येथील अनाथ बालगोपालांना अन्नदान, गरजेच्या वस्तू दान दिल्या. ते स्वतः आश्रमात दोन तीनदा भेटही देवून आले.

त्याच अनुषंगाने या जानेवारी महिन्यात, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, प्रथमच हि समिती रायकर मळा, धायरी येथील ज्ञान गंगोत्री मतीमंद मुलांच्या निवासी शाळेला भेट देवून आली. तेथे असलेल्या मतीमंद मुलां साठी लागणारे जीवनावश्यक अन्नधान्य , या निमित्ताने समितीकडून शाळेस भेट स्वरुपात देण्यात आले. श्री. दिनानाथ कोंडावार, श्री. वसंत माने, श्री. किशोर बारभाई व श्री. मकरंद कापरे हि मंडळी, विजयनगर तर्फे, प्रतिनिधी स्वरुपात, शाळेचे अध्यक्ष श्री. विक्रम कसबे (९२२५५१२८५९) ह्यांना भेटले. ह्याच अनुषंगाने येणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यांवर श्री. कसबे ह्यांनी समितीशी मनमोकळे संवाद साधला. येणाऱ्या काळात त्यांना लागणाऱ्या अनुदानाची कल्पना घेवून समितीने सर्व कर्मचारी वर्गाची व मतीमंद मुलांची प्रत्यक्षात भेट घेतली. शाळेतल्या सर्व व्यवस्थेची पाहणी करून समितीने अखेर सर्वांचा निरोप घेतला.

भेटीच्या वेळेस काढलेले काही फोटो खालील प्रमाणे






श्री विक्रम कसबे ह्यांच्याशी संवाद साधतांना, नारायण सेवा समितीचे सदस्य (खालील फोटो)




पीडितांच्या उत्थानासाठी सर्वस्व वाहून घेतलेले श्री कसबे (सपत्नीक)





आश्रम शाळेचे दुरून काढलेले हे छायाचित्र





खालील काही फोटो आश्रमाच्या आतले...






श्री. कोंडावर व श्री. माने आश्रमातल्या मुलांना बिस्किटांचे वाटप करतांना










मुलांसाठी शाळेमध्ये करण्यात आलेल्या (श्री. कसबे ह्यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या) सुविधांचे काही छायाचित्र












शाळेतल्या कर्मचारी मंडळीं बरोबरचे हे छायाचित्र





विजयनगर तर्फे देण्यात आलेल्या दानाबद्दल आभार प्रदर्शित करतांना श्री. कसबे




श्री. कसबे ह्यांनी व्यक्त केलेल्या आभार पत्राची प्रत




आपणही आपला अमूल्य हातभार, मदत, कुठल्याही स्वरुपात, ह्या गरजू व असहाय्य मुलांच्या विकासासाठी लावाल हीच माफक अपेक्षा. संपर्क : श्री. कोंडावर-9370101398, श्री. पानसे-९८२३९३४१२१

विजयनगर

2 comments:

gajanan said...

अरे नवीन काही नाहीये का ?

Alka Agrawal said...

my self Alka agrawal. all pics are too good ..plz add some new updated of 2011 ganesh utsove ...diwali...etc...