Sunday, January 31, 2010

भजन (वि?)संगती

नमस्कार,

नुकताच मला आमच्या सोसायटीच्या आवारात असलेल्या श्री दत्त मंदिरात, दर गुरुवारी होत असलेल्या भजन कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला. ....श्री. लोटेकर व त्यांच्या कुटुम्बीयांनी घेतलेला पुढाकार हा खरच वाखाणण्याजोगा. मला थोडा उशिरच झाला जायला. रात्री १० ची वेळ. मी आत मंदिरात प्रवेश केला, मोजकी मंडळी दरी टाकुन बसलेली...मी पण त्यात सामिल झालो. तबला तानला गेला, हार्मोनियमच्या काडी २ चा स्वर लावल्या गेला ...आणि भजनाला सुरुवात झाली...मी डोळे मिटले आणि या धकाधकीच्या जीवनातून जरा बाहेर येण्यासाठी देवाचे ध्यान करू लागलो ....दत्त दिगंबरांचे स्मरण केले ......आणि अचानक माझ्या लक्षात आले...कि आपण बसण्या आधी देवाचे दर्शन घ्यायला विसरलो....मी मिटलेले डोळे उघडले, आणि गाभारयाच्या दिशेने बघू लागलो ...अहो आणि काय आश्चर्य मंदिराचे दार कुलुपासकट लावलेले आणि देवापुढचा पडदाही लावलेला....म्हणजे देवाचे दर्शन नाही.....हे काय...? मला कळेना....मी बावचळलो....अहो असं कधीच झालं नव्हतं माझ्या अक्ख्या आयुष्यात ....किती हि उदासीनता...? मला राहवेना....मी हार्मोनियम चे स्वर आळवण्यात गर्क झालेल्या लोटेकर काकांचे ध्यान तोडले आणि त्यांना बोललो ..."काका पडदा का लावलेला आज?".. काकांना माझा प्रश्न कदाचित आवडलेला नसावा बहुतेक, माझ्याकडे अनिच्छेनेच पाहत ते बोल्ले...."अहो पडद्याचं काय घेवून बसलात...तो ऐकणारा बसलाय कि पडद्यामागे...आपण फक्त गायचं....जावू द्या ...." आणि ते भजनात तल्लीन झाले.

मी शांत. पण मनात खूप भाव येऊन गेले. ज्या मूर्तीच्या दर्शनाने मनाला शांती प्राप्त होते...दिलासा मिळतो...भजनाला पूर्णत्व येतं ....गायकाला प्रेरणा मिळते....ती मूर्ती (दर्शन न घेताही) का कुणास ठावूक रुसल्या सारखी वाटली मला ...गायी विना वासरू, आई विना लेकरू , सुर्या विना पृथ्वी तसं देव दर्शना विना भजन .....काहीतरी चुकल्या चुकल्या सारखा वाटत राहिलं त्या दिवशी ..असो ..तरीही कार्यक्रम छान रंगला ...

अश्विन शेंडे