सलग तिस~या वर्षी विजयनगर मध्ये गणपती उत्सव साजरा करण्यात येतोय . आज ह्या उत्सवाचा पहिला दिवस होता . आज श्रीं ची प्रतिष्ठापना करण्यात आली . श्री . किशोर बारापात्रे ह्यांच्या मार्फत श्रीं ची मूर्ती प्राप्त झाली .
"गणपती बाप्पा मोरया " च्या जयघोषात , श्री ची मूर्ती मंडळाच्या सभामंडपात आणण्यात आली.
आज दुपारी ११.३० वाजता श्रीं ची प्रतिष्ठापना करण्यात आली .
सुशील साळवे व सुमुख भागवत ह्यांनी डेकोरेशन ची सर्व जबाबदारी व्यवस्तीतपणे पार पाडली.
श्री गजानन अवचट गुरुजींच्या सहायाने श्री किशोर बारापात्रे ह्यांच्या हस्ते हि प्रतिष्ठापना करण्यात आली .
श्री गणेशाच्या आगमनाने एक वेगळाच उत्साह आणि आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता
संध्याकाळच्या आरतीला सर्व मंडळी जमली होती .
श्री ची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर यंदाच्या वर्षी प्रथमच श्री गणेश याग करण्यात आला.
श्री ची प्राणप्रतिष्ठा चे छायाचित्रीकरन खालील सकेंतस्थळावर उपलब्ध आहे.
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=116259341603107142399&target=ALBUM&id=5518188942216964993&authkey=Gv1sRgCM6ZmIzqt9_ZoQE&feat=email
धन्यवाद,
विजयनगर गणेश उत्सव मंडळ
No comments:
Post a Comment