नमस्कार,
आपल्या विजयनगर सोसायटी बद्दल आज काहीतरी लिहायचं म्हणतोय , सोसायटीला नक्की किती वर्ष झालीत हा विचार करतोय ....शेवटची इमारत , म्हणजे इमारत ७ हि नुकतीच पूर्ण झाली व त्यात बरीच लोकं राहायला हि आलीत ...म्हणजे ....मला वाटतं कि तीन ते साढे तीन वर्ष नक्कीच झाली असतील...नक्की काय लिहायचा हे मात्र आत्ताहि ठरत नाहीये ...पण बघुया...कहितरी सुचेल.....सोसायटी मधे प्ले एरिया आहे....दत्त मन्दिर आहे (मंदिरात दत्त मूर्ती स्थापनेची गडबड सध्या ऐकायला येते)...चिल्ड्रेन्स पार्क आहे....जिम आहे (सुरु व्हायची आहे).....भरपुर मोकळी जागा आहे......gas स्टेशन आहे....गांडूळ खत प्रकल्प आहे (सुरु व्हायचे आहे).....बहरदार असा सोबतीला निसर्ग आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे काय असेल तर सकाळी उठ्ल्या उठ्ल्या....कानांवर पडणारा, समोरच असलेल्या, धारेश्वर मंदिरातल्या घंटांचा नाद, आणि इथून दिसणारे डोंगराला चुंबणारे काळेभोर असे ढगांचे थवे. प्रभातकाळी पक्षांची किलबिल, कुठेतरी सुरु असलेल्या भजनाचा आलाप, शाळेची प्रभातफेरी, मंदिरातला उत्सव, जत्रा, या सर्व रंगांचा असा काही परिणाम होतो मनावर ...कि कितीही दुरून आलेला व्यक्ति सोसोसायटीच्या आत पाउल टाकताच सुखावतो. इमारतीला दिलेली आल्हाददायक रंगसंगति,भव्य पण अतिशय साधेपण लाभलेले प्रवेशद्वार.... उगाच झगझगाट नसला तरी साधे, पण मजबुत असे बांधकाम.
विशेष म्हणजे गेली २ वर्षा पासून मी येथे वास्तव्यास आहे, शहरापासून थोडं लांब जरी असलं आणि गावातले रस्ते जरी थोड़े अरुंद असलेत तरीही सोसायटी चे आत प्रवेश केल्यावर जी निरव शांतता मिळते ...जे समाधान मिळते ..ते खरच शब्दाच्या पलीकडले आहे...किंबहुना ....त्याची अनुभूतिच घेणेच रास्त राहील. सोसायटी मधे खुपच खेळीमेळीचे वातावरण आहे. सोसायटी सध्या builder (श्री विजय तापडिया ) ह्यांच्या अखत्यारीत आहे तरीही, ते स्वतः जातीने जवळपास दररोज येथे येतात व येथिल व्यवस्थेची पाहणी करतात. पाण्याचा मुबलक पुरवठा, तयार gas पाईप लाईन व सदैव तत्पर असा स्टाफ. सोसायटीचे आत असलेल्या रुंद रस्त्यामुळे ह्या सोसायटीला खूपच शोभा आली आहे...मुले प्ले एरिया मध्ये न जाता आत रस्त्यावरच बागडतान्ना दिसतील तुम्हाला. बरीच नवशिकी मंडळी इथल्या(सोसायटीच्या ) रस्त्यांवर चारचाकी व दोनचाकी गाड्या चालवतांना दिसतील. बाळ गोपाळांना हुंदडायला भरपुर आणि मोकळी अशी जागा येथे आहे.......इमारत १,२,३ च्या मागच्या बाजूस तंबू टाकलेले आहेत ,स्वतंत्र पार्किंग साठी आणि समोर प्रवेश द्वारा जवळ भले मोठे रोहित्र युनिट लावलेले आहे. सेक्युरीटी ची व्यवस्था तात्पुरती जरी छोटी असली तरीही ती लवकरच संपूर्णपणे अमलात येईल अशीच अपेक्षा आपण करूया.
तुम्ही आत इमारतीत प्रवेश करन्यास इच्छुक असाल तर तुमच्या साठी लिफ्ट ची सुविधा पण आहे आणि तेही यु. पी. एस. backup सह. मोकळा जिना, भरपुर जागा, आणि त्यात स्वच्छ व भरपुर प्रकाश. कुठेही जिना चढतांना काळोख होणार नाही हि घेतलेली काळजी. आत प्रवेश करतान्ना कमालीचा साधेपणा जाणवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. वर मोकळी टेरेस व टेरेस वरून दिसणारे निसर्गरम्य पुणे शहर ,डि.एस.के. विश्व, सिंहगडचे दृश्य. ड़ोंगर दऱ्या यांचे विलोभनीय दृश्य तेही घरी बसून .....तुम्हाला खरच आमचा हेवा तर वाटत नाही ना?.. ....काय बोलता ....खोटं वाटतय?? अहो येऊन तर बघा जरा.....प्रचिती येईल तुम्हाला.......
बरं धायरी गावातली मानसं हि पण साधिच...तुमच्या कडे काम करणारी बाई, दुध टाकणारा, पेपर टाकणारा, केबल वाला, गस चे बिल घेणारा हे सर्व फारच मनमिळावू आणि सभ्य (असा माझा तरी अनुभव आहे बुवा)....तुम्ही ह्या गावात कुठेही खरेदिला गेलात तरी व्यवस्थित वस्तुंचे भाव तुमच्या साठी लावल्याशिवाय दुकानदार तुम्हाला सोडणार नाही हे नक्की. ह्या गावातले कुस्तिचे फड, बैलांची रेस, शिवजयंती, गणेश उत्सव, व अनेक असे सण फारच धुमधडाक्यात साजरे केले जातात. गावात बरीच बांधकामे सुरु आहेत व लवकरच ह्या गावाला पुणे महानगर पलिकेत समावुन घेणार आहे अशी चर्चा ऐकण्यास येते.
वरील सर्व मते हि माझी व्यक्तिगत मते आहेत.
अश्विन शेंडे